Tuesday, 20 April 2021

सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !!

कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर 

लसीकरण

औषधोपचार

समाज जाग्रुती

सर्वात शेवटी लाँकडाउन !

लसं पुण्यात तयार होते !

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !

१२ कोटी लसी ३ दिवसांत सिरम तयार करते !

महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही !

निवडणूकीला हीचं यंत्रणा काम करते ! 

म्हणजे लस वितरण  व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारचं आहेत !

प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा  ! प्रत्येक मतदान केंद्रात  शिक्षक - तलाठी  - ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे आहे )

सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाफ  लस टोचण्याच्या मदती साठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !

लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही !

बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होईल ! 

हे करू शकतं फक्त सरकार 

             आणि 

    निवडणूक आयोग

सरकारला जमतं नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतीलं लसीकरण करून !

लसीकरण

औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होतं नसेल तर लाँकडाउन केला पाहिजे !

सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं 

सरकारने ४ दिवस ! दिवस रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !

काय वाटत तुम्हाला??????

आपले मत नोंदवा......

 ५४५ खासदार 

२४५ राज्य सभा खासदार

४१२० देशातील आमदार


यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख

२अरब ४५ कोटी ५० लाख रुपये जमा होतील


यात आजी - माजी  खासदार आमदार हे जर पुढे आले तर 

भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल

 

आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची

       

अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून  करीत आहे.

                

 जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.इथे पक्षीय राजकारण करू नये राजकारण करायला दुसर्‍या वाटा आहेत. 


 मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी व विरोध पक्षाच्या नेत्यांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजी माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी..


 अज्ञात..






Sunday, 31 January 2021

कालचे पुढे ! अय्यागडे ईश्यगडे !! : पत्रकार हेमंत जोशी



कालचे पुढे ! अय्यागडे ईश्यगडे !! : पत्रकार हेमंत जोशी 
राष्ट्रवादी आणि भाजपा म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र येतील त्यांची आघाडी या राज्यात महाराष्ट्रात सत्तेवर येईल हे आता जवळपास नक्की निश्चित झाले आहे, मुहूर्त तेवढा बाकी आहे, बातमी कशी बाहेर आली आणि हेमंत जोशी लिहून मोकळे झाले त्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खळबळ माजलेली आहे आणि शरद पवारांच्या मनात तर कुतूहल जागे झाले आहे पण एक बरे झाले कि नजीकच्या काळात राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येताहेत हे शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना आता माझ्या माध्यमातून समजले आहे म्हणजे ते देखील आपला मंत्रालयातील गाशा गुंडाळायला घेतील आणि पुढली रणनीती राजनीती आखून मोकळे होतील. एक मात्र माझ्या याआधीच्या लिखाणातून भाजपा नेत्यांना जे खटकले किंवा खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जे मत त्यांच्या एका जवळच्या आमदाराजवळ व्यक्त केले त्यातून माझे काही महत्वाचे मुद्दे लिहायचे राहून गेले, चंद्रकांत पाटलांचा मोका मिळताच थेट मुका घेणारा म्हणजे त्यांच्या जो सर्वाधिक जवळचा आमदार आहे त्याने जे मुद्दे मला सांगितले माझ्याकडे उघड केले त्यावर माझे पुढले लिखाण आहे. अर्थात असे नाही कि मी त्या मुद्द्यावर याआधी तुम्हाला काही सांगितलेले नाही. होय ! मी तुम्हाला कित्येक दिवस काही दिवस आधीच हे सांगितले आहे कि शरद पवार हे आपला राजकीय पुनर्जन्म निदान या दिवसात तरी ना सुप्रिया सुळे यांच्यात बघताहेत ना अजित पवारांमध्ये, ना रोहित पवारांमध्ये, यादिवसात पवारांना राहून राहून वाटते कि थेट आशिष शेलार यांना कडेवर उचलून घ्यावे आणि त्यांचे भर चौकात चार चौघात कोडकौतुक करावे... 

जरी तसे जाहीर ते सांगत नसले किंवा त्या दोघांचेही राजकीय पक्ष भिन्न असल्याने त्यांना तसे जाहीर करण्यात अडचणी येत असल्याने त्यांना अगदी उघड सांगता बोलता येत नाही पण पवार शेलार हे गुरु शिष्यासारखे प्रेम आता चाणाक्ष मंडळींपासून लपून राहिलेले नाही. शरद पवार यांचे आशिष शेलारांवर मनापासून प्रेम आहे आणि शेलारांनी देखील पवारांना मनातल्या मनात वरले आहे आणि याच गुपित प्रेमप्रकरणाचा मोठा फायदा भाजपाचे तरुण तडफदार दिलदार दमदार नेते तसेच मनात आणले तर संपूर्ण राज्यात आणि कायम मुंबईत त्या शिवसेनेला थेट भिडणारे कायम अंगावर घेणारे, त्यांच्याशी किंवा जात्यंध मुसलमानांशी पंगा घेणारे आशिष शेलार यांना शंभर टक्के होणार आहे. विशेष म्हणजे चतुर हुशार दूरदर्शी राजकीय टरबूज नव्हे तर राजकीय तरबेज माजी नामदार आणि आजचे आमचे आमदार आशिष शेलार यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे पद्धतीने कधीही त्यांचे मास लीडर देवेंद्र फडणवीस यांना आजपर्यंत आजतागायत एकदाही कधीही केव्हाही कोठेही अंडर एस्टीमेट न केल्याने थेट देवेंद्र फडणवीस यांचे देखील ते आवडते आहेत हि त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे शेलार यांची अगदी घरातल्या सदस्यांसारखी त्यांच्या वरिष्ठांशी, दिल्लीतल्या प्रत्येक मोठ्या नेत्यांमध्ये उठबैस आहे, घरोबा आहे, घरच्या सारखे संबंध आहेत त्यामुळे पुढले मुख्यमंत्री होतांना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, सारेच्या सारे त्यांच्या नावाला पाठिंबा देतील त्यामुळे यापुढे भावी मुख्यमंत्री म्हणून आशिष शेलार हे स्पर्धेत पहील्या नंबरवर असतील. इतरांचाही विचार नक्की केल्या जाईल अगदी माजी मंत्री आणि माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष सुधीरजी मुनगंटीवार यांचे देखील नाव चर्चेत असेल पण गडकरी यांच्याशी बांधिलकी, त्यांना कायम अडचणीची ठरते, यावेळी देखील तेच घडेल त्याऐवजी त्यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून विचार केल्या जाऊ शकतो... 

आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. तुटलेला धागा जसा पुन्हा जोडल्या जात नाही, घरातली बिघडलेली दुरावलेली नाती जशी पुन्हा एकमेकांना जवळ आणत नाहीत तेच राजकारणात बरेचदा बघायला मिळते. विशेषतः शरद पवारांच्या मनात अमुक एखाद्याविषयी एकदा जर का राग उत्पन्न झाला नफरत निर्माण झाली तर ती ज्या नेत्यांविषयी व्यक्तींविषयी निर्माण झालेली असते त्या त्या माणसाला मग पवार यांच्यापासून अनेक वेदना भोगाव्या लागतात, चिडखोर सासूसारखा त्रास व अपमान पदोपदी सहन करावा लागतो, नेमके हेच अगदी सुरुवातीपासून त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडले आहे, विशेष म्हणजे मी तर त्याही कालखंडाचा अगदी जवळून साक्षीदार आहे ज्या काळात हेच पवार त्या गोपीनाथ मुंडे यांना देखील आजच्या देवेंद्रसारखे थेट खूप उघड कायम पाण्यात पाहायचे बघायचे आणि शरद पवार यांची हि मला न भावलेली अतिशय वाईट अशी खोड व सवय आहे ज्यामुळे भलेभले राजकीय नेते किंवा तत्सम अनेक उध्वस्त झाले आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या हयातीतच फडणवीस देखील असे उध्वस्त व्हावेत ते तसेच पवारांचे वागणे बोलणे व खेळणे सतत सुरु असते अर्थात त्यात शरद पवार यांची शंभर टक्के चूक आहे म्हणता येणार नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस या राज्यातले एकमेव अद्वितीय ज्यांनी शरद पवार यांना थेट राजकीय आव्हान दिले त्यांच्या अनेकदा नाकात दम आणला, थेट पवारांचे विश्वासू साथीदार त्यांच्या घरातले सदस्य फडणवीसांनी आपल्याकडे खेचून राष्ट्रवादी अनेकदा खिळखिळी केली असल्याने शरद पवार यांना फडणवीसांचे हे थेट व महागडे आव्हान कायम झोंबले आहे त्यातून त्यांना काहीही झाले तरी निदान या राज्यात फडणवीसांना तोंड वर करु द्यायचे नाही आणि आपल्या राजकीय निवृत्तीआधी व आपल्या हयातीत आपल्यासारखे फडणवीसांना आव्हान देणारा नेता प्रसंगी भाजापामध्ये देखील निर्माण करायचा म्हणून यापुढे पवारांना साऱ्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस येथे या राज्यात काहीही झाले तरी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नको आहेत त्याऐवजी त्यांना त्यांचा लाडका त्यांचा विश्वासू आशिष शेलार एकमेव नक्की चालणारा हा मुख्यमंत्री नवा हवा आहे. फडणवीसांचा निदान आज तरी पवार यांनी गोपीनाथ मुंडे करून ठेवला आहे, हि भळभळणारी जखम माझ्यासारख्या फडणवीसांच्या चाहत्यांना आता यापुढे कायमस्वरूपी बँडेज बांधायला भाग पाडणार आहे जे अत्यंत दुर्दैवी आहे... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

















Saturday, 30 January 2021

अय्यागडे इश्यगडे ! माझा आवडता नेता साऱ्यांना आवडे !! पत्रकार हेमंत जोशी



अय्यागडे इश्यगडे ! माझा आवडता नेता साऱ्यांना आवडे !! पत्रकार हेमंत जोशी 
आज याठिकाणी जे काय लिहिणार आहे ते तुम्ही नीट आधी वाचून ठेवा नंतर जपून ठेवा प्रेयसीने पाठवलेल्या प्रेम पत्रासारखे कारण हे लिखाण तुम्हाला पुन्हा एकदा उघडून बघावे लागणार आहे. माझे या राज्यातले आजवरचे तसे अनेक आवडते नेते आहेत किंबहुना माझा जसा अमुक एखादा स्पेसिफिक अभिनेता किंवा अभिनेत्री आवडते नाहीत ते त्या त्या सिनेमापुरते आवडलेले आहेत तसे मित्र प्रशांत दामले मला अमुक एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत कधीच आवडलेला नाही पण त्याच्या विविध नाटकातल्या भूमिका, त्या बघण्यासाठी मी काहीही करू शकतो म्हणजे एकदा तर थेट लंडन मध्ये दूरवर कुठेतरी त्याच्या एका नाटकाचा प्रयोग होता, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी लंडन फिरायचे सोडून तेथे कितीतरी दूरवर एका उपनगरात त्याचे ते नाटक बघायला पोहोचलो त्यावर माझा चैतन्य जयंत जोशी नावाचा मूळ गाववाला मित्र साक्षीदार आहे, किंवा मला तेथे बघून प्रशांत देखील आधी दचकला मग सावरला कारण वयस्क वंदना त्याच्या संगतीने होती कोणीही तरुण अभिनेत्री त्या नाटकात नव्हती. लोकांना शाहरुख खानचे सिनेमे भलेही आवडत असतील पण मला त्याचे अगदी मोजके सिनेमे आवडलेले आहेत, एकदम फाल्तुक जातीयवादी व व्यसनी अभिनेता असे माझे त्याच्याविषयी अधिकृत मत आहे अर्थात त्या जोडप्याच्या देशद्रोही व्यसनांवर त्याचा मित्र अर्जुन रामपाल अधिक सांगू शकेल. मला या राज्यातले नेते देखील त्यांच्या त्या त्या वेळेच्या घेतलेल्या निर्णयांवर भूमीकेवर आवडतात अगदी शरद पवार देखील माझे ऑल टाइम फेव्हरेट नाहीत पण आवडण्याच्या बाबतीत ते माझ्यासाठी अतिशय वरच्या क्रमांकावर आहेत, एक नेता मात्र असा आहे जो मला कायम आवडत आलेला आहे, काल आवडत होता, आज आवडतो आणि उद्या देखील आवडेल कारण त्याच्या डोक्यात कायम देशभक्तीचे वारे घोंघावत असते अर्थात तो नेता देवेंद्र फडणवीस आहे हे तुम्हाला वेगके सांगण्याची आवश्यकता नाहीच. मला तुम्हाला शाळेत जसे सांगायचे कि माझा आवडता नेता या विषयावर निबंध लिहून आणा तसे आज जर पुन्हा कोणी सांगितले तर मी शंभर टक्के : आवडता नेता देवेंद्र फडणवीस : असे लिहून मोकळा होईल. अलीकडे म्हणे माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याने माझा आवडता नेता जयंत पाटील असा निबंध लिहून आणला होता तेव्हा अख्खी शाळा त्याच्यावर फिदी फिदी हसली होती... 

जेव्हा माझा आवडता नेता अगदी जाहीर सांगतो कि आम्हाला पुढे फार दिवस विरोधात बसायचे नाही तेव्हा त्याच्या सांगण्याला अर्थ असतो बेस असतो सत्यता असते उगाच वाट्टेल ते बरळून सांगून मोकळा होणार्यातला तो टाइम पास नेता नाही हे नक्की आहे आणि तशा जोराच्या हालचाली कोरोना ओसरताच राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या आहेत आणि राज्यात राजकीय बदल किंवा राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होणार घडणार आहे हि आता काळ्या दगडावरची रेघ रेष आहे. ज्या नव्या राजकीय सिनेमाची तुम्ही सारे अगदी आतुरतेने वाट बघत होता ती वेळ नक्की येऊन ठेपलेली आहे आणि जर पुढल्या काही महिन्यात हे असे राजकीय समीकरण बदलले नाही तर त्यानंतर पुढे उरलेली सारी वर्षे काहीही घडणार नाही त्यातून राज्यातल्या भाजपचेच मोठे नुकसान होईल आणि हे नुकसान भाजपाला नक्की येथे व देशातही परवडणारे नसल्याने राज्यात राजकीय बदल अटळ आहेत हेच नेमके मला येथे मुख्यत्वे म्हणायचे बोलायचे लिहायचे आहे किंवा तुम्हाला लेखी द्यायचे आहे. सत्तेतून काँग्रेस बाहेर पडेल हे जवळपास नक्की ठरले आहे पण काँग्रेस बाहेर पडल्यानंतर ती उरलेल्यांना बाहेरून पाठिंबा देईल असे अजिबात नाही किंवा भाजपातले काही आमदार फुटतील आणि ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सामील होतील असे तर अजिबात घडणार नसल्याने मला येथे नेमके तेच सांगायचे आहे कि महाआघाडीचे अस्तित्व व भवितव्य आता अंधारलेले व अस्थिर झालेले अधिक दिसते आहे आणि येथे राजकारणात तुमची इच्छा काय आहे असते त्याला अजिबात अजिबात महत्व नसते म्हणजे मला तर आजही वाटते कि दोन हिंदू संघटनांनी राजकीय पार्टींनी म्हणजे शिवसेना आणि भाजपा किंवा भाजपा आणि मनसे यांनी कायम एकत्र असावे एकत्र नांदावे पण यापुढे तसे अजिबात घडणार नाही माझ्या मनासारखे आता काहीही होणार नाही, एक मात्र माझ्या आमच्या तुमच्या साऱ्यांच्या मनात जे होते ती आशा आता धूसर होते आहे म्हणजे आपले अतिशय लाडके लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकवार आपण सारेच मुख्यमंत्री होण्याचे करण्याचे जे स्वप्न बघत होतो ते आता केवळ स्वप्न राहणार असे दिसते मला माहिती मिळाली त्याप्रमाणे तसेच वाटते कि थेट नरेंद्र मोदी यांना राज्यापेक्षा देवेंद्र यांनी यापुढे देशाचे नेतृत्व तेही पाहल्या फळीचे नेतृत्व त्यांनी करावे असे आता त्यांना वारंवार वाटत असल्याने उद्याचे या देशाचे खूप खूप मोठे नेते देवेंद्र फडणवीस असेच आपल्याला बघायला मिळणार आहे... 

शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी महाआघाडीतून या राज्यात बाहेर पडेल आणि ते व भाजपा उरलेली पंचवार्षिक योजना एकत्र असतील अशी माझी माहिती आहे आणि जे शरद पवारांना येथे नको आहे व वर केंद्रात नरेंद्र मोदी यांना हवे आहे ते तसे येथे घडेल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वर दिल्लीत बोलावून घेतले जाईल आणि दिल्लीत महाराष्ट्रातले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यापैकी एक येथे मुख्यमंत्री म्हणून येतील काम बघतील पण तशी हवा जरी असली तरी सबकी मधुबाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर येथे येतील आणि मुख्यमंत्री होतील असे अजिबात वाटत नाही खरी स्पर्धा हि नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघात असेल त्यात आतुर व चतुर पियुष गोयल यांना तुम्ही मुख्यमंत्री करावे असा मोदी यांचा पवारांकडे हट्ट व आग्रह असेल पण मला वाटते शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे आपापसातले ट्युनिंग व मैत्री किंवा याराना व दोस्ताना बघता, पवार सांगतील म्हणतील कि मला येथे माझे आवडते गडकरी हेच मुख्यमंत्री म्हणून हवेत. वास्तविक हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे कि पवारांना नेमके देवेंद्र फडणवीस कधी समजलेच नाही त्या दोघांमध्ये जर सुमधुर संबंध राहिले असते तर त्याचा मोठा फायदा राज्याला व राष्ट्राला देखील झाला असता पण हा आपल्या राज्याचा आपल्या नंतर कायमस्वरूपी शरद पवार होऊ शकतो नेमके हेच पवारांना सुरुवातीपासून देवेंद्र बाबतीत खटकत असल्याने त्यांनी कायम फडणवीसांविषयी मनात राग ठेवला त्यांचा सतत द्वेष केला त्याचवेळी राज्याचे भले गडकरी यांच्यात करण्याची मोठी क्षमता आहे हे पवारांना माहित आहे पण त्याचवेळी त्यांना हेही माहित आहे कि गडकरी यांना तब्बेतीच्या व वाढत्या वयाच्या मोठ्या समस्या असल्याने त्यांना पुढे मोठ्या मर्यादा आहेत त्यातून ते माझी जागा या राज्यात घेणे अशक्य आहे म्हणून पवारांना फक्त गडकरी हवे आहेत किंवा त्यांना प्रकाश जावडेकर नावाचे कच्चे लिंबू किंवा पियुष गोयल नावाचे कडुलिंब चालणारे आहे पण त्यांचा आग्रह नक्की फक्त आणि फक्त नितीन गडकरी यांच्यासाठी आहे, असेल, दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे  त्यांच्या प्रेमाचे राजकीय लफडे आहे. आज सकाळीच मला विचित्र स्वप्न पडले आहे म्हणजे नरेंद्र मोदी घोडीवर बसलेले आहेत त्याचवेळी देवेंद्र फडणवीस नववधूच्या पेहरावात घुंघट घेऊन बसले आहेत आणि मी मात्र पुंगी वाजवून गाणे म्हंणतो आहे, मेरी प्यारी बहेनीया बनेगी दुल्हनीया... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी




























Friday, 29 January 2021

मीडिया : महाभयानक वास्तव : पत्रकार हेमंत जोशी

मीडिया : महाभयानक वास्तव : पत्रकार हेमंत जोशी 
मीडिया मग ती प्रिंट मीडिया असेल विविध भाषांमध्ये बातम्या देणाऱ्या वाहिन्या असतील किंवा इतर मीडिया, अलिकडल्या काही वर्षात सारीच मीडिया स्वतःला नेता किंवा लोकप्रतिनिधी समजायला लागलेली आहे कारण आम्हा मीडियाकडे जे शासन असते राज्यकर्ते असतात ज्यांच्या हाती सत्ता असते जे राजकारणात असतात जे सत्तेत बसतात असतात त्यांची प्रचंड नको ती माहिती उपलब्ध होत असल्याने हे सारे नको तेवढे मीडियाला घाबरून असतात नेमका त्यांच्या घाबरण्याचा मोठा गैरफायदा उचलतांना साऱ्याच प्रकारातली मीडिया दिसते आहे, धजावते आहे. आपण पारदर्शी असल्यास मीडियाला घाबरण्याचे काही कारण नसते जसे आजतागायत मी राज्यातल्या मीडियामध्ये जे हरामखोर आहेत नीच हलकट बदनाम बदमाश आहेत अशांच्या कितीतरी वेळा विरोधात लिहिले असेल त्यांच्यावर जहरी टीका तर पदोपदी क्षणोक्षणी मी करत आलो आहे कारण मी आमच्या मीडिया क्षेत्रात कायम माझ्या गुण दोषांसहित सामोरा गेलो आहे जातो आहे किंबहुना माझे दुःख माझ्या अडचणी माझ्या बऱ्या वाईट सवयी माझे यश माझे अपयश माझ्या भानगडी मी कायम सार्वजनिक केलेल्या आहेत त्यामुळे मला आमच्यातल्या रंडीछाप मीडिया मंडळींची ना कधी भीती वाटली ना कधी यापुढे देखील वाटेल पण शासनात सत्तेत राजकारणात काम करणाऱ्यांचे असे नसते त्यांचा जवळपास साऱ्यांचाच चेहरा आणि मुखवटा वेगळा असतो त्यांना तो तसाच वेगवेगळा ठेवायचा असल्याने या मंडळींना मीडियाची जबरदस्त भीती असते भीती वाटते नेमका त्यांच्या या घाबरण्याचा मोठा गैरफायदा आम्ही मीडिया क्षेत्रात काम करणारे किंवा मीडिया मालक घेत आले आहेत,  पुढेही हे असेच त्यांचे घाबरणे सुरु राहिले तर आणखी आणखी गैरफायदा घेणारच आहोत, दरदिवशी आमच्यातले महाबदमाश राजदीप सरदेसाई असेच जन्माला येणार आहेत... 

अलीकडे अनेकांनी पाठवलेला एक किस्सा येथे सांगतो. एका गाढवाला एका झाडाला बांधलेले होते. एका रात्री एका भुताने दोरी कापून त्या गाढवाला सोडले. गाढवच ते, त्याने जाऊन मग एका शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या शेतकऱ्याच्या मालकाच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. साहजिकच गाढवाचा मालक उध्वस्त झाला, प्रत्युत्तरादाखल त्याने शेतकऱ्याच्या बायकोला दगडाने ठेचून ठार मारले. पत्नीच्या मृत्यमुळे चिडलेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. त्यावर गाढवाच्या मालकाच्या मुलांना राग आला त्यांनी त्यानंतर शेतकऱ्याच्या घराला आग लावली. शेतकऱ्याच्या मुलांनी मग गाढवाच्या मालकाच्या मुलांना ठार मारले. शेवटी जेव्हा हे सारे बघून त्या शेतकार्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला कि, तुझ्यामुळे सगळे मेले. सांग, तू असे का केलेस ? त्यावर भूत उत्तरले, मी कुणालाही ठार मारलेले नाही मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले. तात्पर्य: आज अख्खी मीडिया आम्ही माध्यमे त्या भुतासारखे झालो आहोत. आम्ही दररोज असे एखादे किंवा अनेक गाढवे सोडतो आणि इतर सारे तुम्ही त्यावर एकतर प्रतिक्रिया देता किंवा एकमेकांशी भांडत बसता, वाद घालता, सारे कुठलाही कसलाही विचार न करता एकमेकांना दुखावतात. एकमेकांपासून दुरावतात. एकच सांगतो, मीडिया माध्यमे मग ती कोणतीही असोत, सोडलेल्या प्रत्येक गाढवावर प्रतिक्रिया न देण्याची, अपसेट न होण्याची जबाबदारी लोकांची, अर्थात तुमची. आपापसात चांगले सलोख्याचे संबंध ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे कारण आम्ही तमाशा घडवून आणतो, त्या भरवशावर पैसे कमावतो... 

आपले साऱ्यांचे नशीब चांगले कि बलवत्तर तो नालायक हरामी राजदीप सरदेसाई रेड हॅन्ड पकडल्या गेला अन्यथा त्याने सोडलेल्या बातमीवर केवढे रणकंदन माजले असते पुन्हा अनेकांचे जीव गेले असते वरून एखादा राजकीय पक्ष विशेषतः भाजपा आणि विविध नेते बदनाम झाले असते. मीडिया म्हणजे नेते नव्हेत, मीडिया म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हेत मीडिया आमदार नसते खासदार नसते केवळ योग्य ती माहिती जनतेसमोर उघड करणे आमचे काम असते, दलाली भडवेगिरी करणे हे मीडिया चे काम नाही. आजकाल मंत्रालय असो कि सरकारी निमसरकारी कार्यालये, महापालिका, लोकप्रतिनिधींपेक्षा मीडियाचा याठिकाणी यासाठी वावर असतो कि आमच्यातल्या बहुसंख्य असंख्य दलालांना मलिद्याची विविध असंख्य कामे करवून घ्यायची असतात, हे घडता कामा नये, मीडियाला उठसुठ घाबरणे योग्य नाही अर्थात काम करून देणारा स्वतः भानगडी करणारा नसावा पण असे सत्तेच्या बाजारात क्वचित खचित घडत असल्याने जो तो मीडियाला भयंकर घाबरतो त्यातून मीडियातले रंडीछाप दलाल कित्येक पटीने पैसे कमावून मोकळे होतात. असल्या फाल्तुक मीडियावर जरब बसवण्याची वाचक बसवण्याची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. मीडियाचे महत्व त्यातून मीडियाचा देशातील राज्यातील प्रत्येक मोठ्या माणसाशी प्रत्यक्ष संबंध येणे स्वाभाविक आहे असते, नेमका या ओळखीचा सलगीचा गैरफायदा मीडिया मोठ्या प्रमाणावर उचलतांना दिसते आहे जे अत्यंत घातक आहे... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 














Wednesday, 27 January 2021

Vinay Deshpande-PWD, please stop this man !



Vinay Deshpande-PWD, please stop this man ! 

PWD in Maharashtra is unanimous with corruption. It is an understatement to call the department only corrupt. I feel PWD plays with emotions of common man. In spite of getting funds and monies-- if we get bad roads, if we have badly constructed bridges and poor maintenance of Government offices & residences, it is as good as playing with emotions for me. Minister Ashok Chavan is trying to get the image up and clean the office, but problem is, he still isn’t understanding the modus-operandi. He needs to know the 'Quazi' of the department, and many such big time dalaal's who are brazenly looting the government hand-in-glove with the bureaucrats. And yes, Chavan is also often caught in Catch-22 when the Delhi 'heavyweight' calls him and says, 'this work has to be done and give it to this company'...Those who don't know PWD, it is a very "Maratha" power-stricken department. CP Joshi, Secretary of the department, couldn't move a single file in spite of being the top boss because the lowest sectional engineer was a Maratha. A very caste spirited department. But now have heard all the Brahmin's of the PWD, retired one's, have a formed a consultancy company in Navi-Mumbai and are getting majority of the work sanctioned in their company's names, thanks to again, heavy-weight Brahmin of Delhi. "Dandavat" Pranaam saglyana.... But does not mean, I won't write against Brahmin's....The below blog is against a Brahmin secretary & his AB'use' of power... 

 Anyways, for the last few years one particular ‘rockfall protection’ work in the PWD Maharashtra (National Highways Dept) is being handed over to ‘Pioneer Foundation Engineers Pvt Ltd’ without following any rules and regulations ALLEGEDLY with the help of Department Secretary Vinay Deshpande (allegedly also a partner with Pioneer). The tenders are prepared by the contractor (Geobrugg) and the officials print it in official tenders without even checking it (I have the copy, official logo in tender copy). For the naysayers, Geobrugg is a Swiss Company that does the back-end work (copy given) whose material is used by actual contractor Pioneer Foundation. 

 Last 10 tenders and more, only 2 companies (i.e., Pioneer foundation engineers and Meccferri Environmental solutions) have qualified and only 1 company (Pioneer foundation engineers pvt ltd) has got work causing a loss of over Rs. 200 crores to the state. All tenders have been filled above the rates. Geobrugg is the company whose product (nets and barriers) is used by Pioneer foundation for their site work...which completes the cartel so that no one is suspicious. (site pics and shipping tag given) All Pioneer Foundation company sites have Geobrugg material for which Geobrugg does back-end work of keeping officers happy.

 What is heard & said in the PWD is that Geobrugg provides all good facilities to Vinay Deshpande and junior officers working including kickbacks, fancy foreign trips (all benefits included, need not elaborate) and Geobrugg does this obviously on behalf of Pioneer Company; so there is no mention of anything changing hands in between Deshpande and Pioneer in spite of receiving benefits (I have attached UK foreign; please log on to www.vikrantjoshi.com). Many other 'clean' junior officers have raised the issue of irregularity with Vinay Deshpande but brazenly sidelined (internal note of officer Jaiswal given) 

Now the scam:

The Maharashtra government is constructing breast wall at various places and tunnel in Kalyan and Malshej ghat on the instructions of the union transport ministry. Interestingly, only two companies have been participating in the tender process. They are Pioneer Foundations Engineers Pvt Ltd. and Maccaferri Environmental Solutions Pvt Ltd. More interestingly, only Pioneer has been awarded the contract every time. The PWD invited another tender in December 2020 on behalf of Union Ministry of Road Transport and Highways headed by Nitin Gadkari. This tender is for the protective measures in Malshej ghat. Again, the same two companies are in race. The technical data sheet submitted by Pioneer is inspired by a design prepared by a Switzerland based company Geoburgg. Vinay Deshpande, a PWD official, claims to have visited Geoburgg campus on a study tour. Interestingly, the sign boards seen behind him in the picture indicate that he was on some other foreign land.

S.N. Jaiswal, senior division accounts officer, with Ministry of Transport had raised objection in 2018 (I have the copy) that the tenders are being designed to be suited for two companies only. In the fresh tender for Malshej a company ABV Govindu are also a bidder. There is a doubt that this is a dummy company. Question is why Pioneer is getting all the contracts? Who is their God father? Are the tender terms being dictated to suit one particular company? Why? To serve whose interests? Is the breast wall in Malshej is an absolute need? Who has recommended its construction?

 There is current tender of Rs. 64 crores for Malshej ghat and in that again the same companies have been qualified and Meccaferri Environmental Solutions (Italian company) has been qualified inspite of GOI guideline for not allowing foreign company to participate in tender below Rs. 200 crore and obviously another is a dummy company (ABV Govindu); this must be thoroughly investigated; in this tender also, there is TAFS issue. Most of the times the TAFS (technical and financial sanction) for the tender is also not taken and tender is floated which is illegal. When the TAFS comes it is shown backdated hence the estimates are also managed causing loss to government. 

Pioneer foundation is the same company that was accused of faulty work and submitting false IIT Bombay report in Chhatrapati Shivaji Maharaj statue failure case and since then the report just vanished / ‘missing’ from the PWD department; matter pending in high court (mention of IIT B admitting to false report and major mistakes committed by pioneer is submitted in petition copy). 

We need to stop this Vinay Deshpande. His passport should be impounded with immediate effect. Nowadays it has become a fashion to 'manage' Departmental Inquiry. How many times and why has Deshpande travelled abroad? Did he have all the permissions in place for such travel? Time for ACB to take a clue from this.

 

Vikrant Hemant Joshi

पवारांचा पराजय : दिलीप माणगावे

 पवारांचा पराजय : दिलीप माणगावे 

पवार साहेब अदानी आणि अंबानी महाराष्ट्रात केंव्हाच आले आहेत. सहकारी आणि समाजवादी व्यवस्थेचा टराटरा बुरखा फाडणारी दैनिक पुढारी मधील दत्त इंडिया कंपनीची जाहिरात वाचा. दैनिक पुढारी या दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकात २० जानेवारीच्या अंकात श्री दत्त इंडिया या कंपनीची दोन पूर्ण पानी जाहिरात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील लुटीचा पर्दाफाश करणारी आहे.सरकारी संरक्षणाचा लाभ घेवून ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरंजामी पुढार्यांकडून होणारी लूट हा काही आता नवा विषय राहिलेला नाही.सांगली म्हणजे सहकाराची राजधानी. वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेला साखर कारखाना त्यांच्या हयातीत चांगला चालला.फक्त दादा या नावावर त्यांच्या वारसांनी अनेक वर्षे खासदारकी आणि आमदारकी मिळवली.दादांच्या नंतर एकेक संस्था डबघाईला आल्या.... 

साखर कारखाना त्यापैकी एक प्रमुख संस्था. या कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले.या कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. गेली अनेक वर्षे या कारखान्याच्या ऊस उत्पादकांना बिले मिळत नव्हती.कलकत्त्याच्या श्री दत्त इंडिया कंपनीने हा कारखाना १० वर्षासाठी चालवायला घेतला.रुपारेल आणि धारू हे खाजगी उद्योजक या कंपनीचे प्रमुख संचालक.कंपनीने सांगली जिल्हा बँकेचे कर्ज, शेतकऱ्यांची आणि कामगारांची जुनी देणी द्यायला सुरुवात करून कारखाना सध्यातरी चांगला चालवला आहे. याच कंपनीने न्यू फलटण शुगर हा राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचा बंद पडलेला कारखाना अवघ्या १४ दिवसांत सुरू करून करून रूळावर आणला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे  खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेला महालक्ष्मी दूध संघही या कंपनीने चालवायला घेवून दूध संकलन ५० हजारावरून दिड लाखावर नेले आहे.कंपनीने आता दररोज १० टन पावडर तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.ऊस, दूध कच्चा माल तोच.कामगार तेच.तीच मशिनरी.तीच तयार होणारी साखर.पॅकींगमधून पूर्वी प्रमाणे त्याच गाई म्हशींचे दूध मिळतंय...

पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी या संस्था डबघाईला आणल्या. ऊस उत्पादकांनी यांच्या चार पिढ्या खांद्यावर घेऊन नाचवल्या.यांच्या बापजाद्यापासून नातवंडांपर्यंत दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात सन्मानाने बसवले.शेतकऱ्यांचा फायदा काय झाला?डोक्यावर कर्ज.आणि हातात न मिळणार्या आरक्षणाची थाळी आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात विद्या मुरकुंबी,विल्मर, डालमिया, रूपारेल,धारू हे अदानी आणि अंबानींचे भाऊबंद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट पुढार्यांनी बंद पाडलेले कारखाने आणि दूध संस्था विकत आणि भाड्याने घेऊन व्यवस्थित चालवत आहेत.याचे कारण काय?

आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. हा प्रामुख्याने मराठा समाज आहे. आजही आदरणीय शरद पवार साहेब या समाजाचे नेते आहेत.ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची कर्जबाजारी अवस्था त्यांना दिसत नाही काय? त्यांच्या गोतावळ्यातील माणसांनी शेतकऱ्यांची चालवलेली लूट पवार साहेब का नजरेआड करताहेत? दोन साखर कारखान्यात अंतराची अट घालून महाराष्ट्रातील औद्योगिक विकास का रोखला जातोय? पवार साहेब तुमच्या गोतावळ्याच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अजून किती दिवस गुलामगिरीत काढायचे?दिल्लीत जावून अदानी आणि अंबानी यांना विरोध करताय. पण कोल्हापूर, सांगली, सातारा या तुमच्या भागात काय चाललंय? मुरकुंबी, डालमिया,विलमर, रूपारेल,धारू या अदानी आणि अंबानी यांच्या भाऊबंदांनी तुमच्या साम्राज्यात केंव्हाच प्रवेश केला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील दूध संघांनी यशस्वीरीत्या दूध संकलन सुरू केले आहे.... 
भरपूर सूर्यप्रकाश,उष्ण आणि समशीतोष्ण हवामान, काटकसरीने वापरले तर पुरेसे पाणी अशी नैसर्गिक श्रीमंती असूनही महाराष्ट्रातील शेतकरी दिवसेंदिवस दारिद्री होतोय. पवार साहेब महाराष्ट्रात अदानी अंबानी केंव्हाच आले आहेत. त्यांच्यासाठी पायघड्या तुमच्याच अकार्यक्षम गोतावळ्याने घातल्या आहेत.... 
तात्पर्य : जातीचे, पक्षाचे,धर्माचे, प्रादेशिक अस्मितेचे बांध घालून शेतकऱ्यांचा विकास अडवता येणार नाही. पाणी जसे उताराच्या दिशेने वाहते.तसं प्रगती ही दारिद्र्याच्या दिशेने पळत सुटते. अदानी आणि अंबानींच्या नावाने खोटा कंठशोष करून काळाचे चक्र उलटे फिरवता येणार नाही. पवार साहेब तुमच्या आर्थिक धोरणांचा पराभव शरद जोशी, नरसिंहराव, मनमोहनसिंग यांनी केंव्हाच केला आहे. आता उरलाय तो केवळ राजकीय सांगाडा. तो ही आता फार दिवस टिकणार नाही... 

दिलीप माणगावे, राज्य प्रवक्ता, रयत क्रांती संघटना

Tuesday, 26 January 2021

अयोध्या : माधव भांडारी



अयोध्या : माधव भांडारी 

तुमच्या माझ्या सभोवताली अशा काही तरुणी असतात कि ज्या देखण्या असतात चिकण्या असतात उफाड्या असतात रूपवान गुणवान धनवान असतात पण काही केल्या त्यांचे लग्न जुळत नाही होत नाही. वय संपते पाळी जाते तरीही त्यांचे काही केल्या जुळत नाही पुढे तर त्या एखाद्या अतृप्त आंत्म्यासारख्या फिरतांना जगतांना हिंडतांना भटकतांना दिसतात कारण त्यांचे स्वप्न अधुरे राहते मन देखील इकडे तिकडे भटकत राहते अशावेळी घरातल्यांना त्यांची सतत काळजी लागून राहते आणि त्या स्वतः देखील काळजीने काळवंडून कोमेजून जातात. भाजपाचे जिगरबाज धडाकेबाज नेते आणि उत्तम प्रवक्ते श्रीमान माधव भांडारी  यांचे देखील असेच वय निघून गेलेल्या उफाड्या निधड्या तरुणीसारखे झाले आहे म्हणजे तरुणीची बाई झाली किंवा तिच्या वयाच्या मुली आजी झाल्या तरी तिला मधुचंद्र कशाशी खातात जसे ठाऊक नसते तसे माधवराव भंडारी यांचे त्यांच्या वरिष्ठांनी करून ठेवले आहे, ज्या वयात आधी आमदार व्हावे नंतर लगेच नामदार व्हावे असे ज्या भांडारी  यांना किंवा त्यांच्या चाहत्यांना राहून राहून वाटत होते त्यांच्यावर अन्याय केल्या गेला असे आमच्यासारख्या त्यांच्या अनेक हितचिंतकांना नक्की वाटते पण लग्न राहून गेले पद्धतीची त्यांची भलेही त्यांच्या श्रेष्ठींकडे तक्रार असेल पण लॉयल भांडारी  यांनी स्वतःचा एकनाथ खडसे करून घेतला नाही याउलट आजही काहीसे अतृप्त भांडारी  पूर्वीच्याच उत्साहात भाजपने टाकलेल्या जबाबदाऱ्या निभावण्या उभा महाराष्ट्र पालथा घालतात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण किंवा कल्पकतेने भाजपाची कायम कधी प्रवक्ते म्हणून तर कधी विटाळ निघून गेलेल्या पोक्त बाईसारखे अत्यंत अभ्यासू भाजपा नेते म्हणून विविध वाहिन्यांवर प्रभावीपणे बाजू मांडतात कोणतेही कार्य तडीस नेतात... 

राज्यात विविध पक्षाचे नेते विविध मागण्यांसाठी कायम मोर्चे काढतात,  मोर्चांना गर्दी असते पण गर्दीतल्या लोकांना मोर्चा नेमका कशासाठी कोणत्या कारणांसाठी कुठल्या मागण्यांसाठी माहित नसते कारण बहुतेक मोर्चेकरी भाडोत्री असतात. थोडक्यात हनिमून शब्द देखिल पाठ नसलेल्याने थेट पलंगावर उडी घेतल्यासारखे ते असते. अलिकडल्या भाजपा विरोधी शेतकाऱ्यांच्या मोर्चात तर ज्यांना शेती किंवा खेती हा शब्द देखील धड उच्चारता येत नाही त्या भेंडी बाजारातल्या बहुसंख्य मुस्लिम महिला त्या मोर्चात अशा काही सामील झाल्या होत्या जणू त्यातल्या प्रत्येकीकडे किमान २५ एकर तरी शेती असावी त्यामुळे जेव्हा त्यांना मीडियाने हा मोर्चा कशासाठी जेव्हा विचारले तेव्हा त्यांची तेथून पळता भूइ थोडी झाली. तेच रामजन्म भूमी अयोध्या राम मंदिर या विषयांचे, अनेक हिंदूंना बहुसंख्य भाजपा कार्यकार्त्यांना देखील अयोध्या नेमके काय प्रकरण आहे, आजही ठाऊक नाही केवळ कार्यकर्ते म्हणून हि मंडळी नेत्यांच्या आंदोलनाची केवळ री ओढतांना मी तुम्ही आम्ही सारे बघतो आहे, नेमके हेच अभ्यासू बुद्धिमान लेखक आणि भाजपा नेते माधव भांडारी  यांच्या ते लक्षात आले असावे, किमान हिंदूंना किंवा मराठी माणसाला तरी राममंदिर व अयोध्या हा विषय तंतोतंत माहित ज्ञात असावा त्यांना तसे नक्की वाटले असावे म्हणून ज्यांनी अयोध्या वादात सुरुवातीपासून प्रत्यक्ष भाग घेतला त्या विषयाचा सखोल अभ्यास केला त्या भांडारी यांनी अलीकडे "अयोध्या" या मथळ्याखाली सखोल अभ्यासपूर्ण व्यापक भारावून टाकणारे माहितीपूर्ण संग्राह्य असे कादंबरी वजा भव्य पुस्तकच लिहून काढले जे प्रत्येक मराठी माणसाने अवश्य वाचावे व संग्रही ठेवावे, थोडक्यात इतरांनाही वाचायला द्यावे.... 

वाचकमित्रहो, तुम्हाला माहित आहे का कि रामजन्मभूमी वाद गेली चाळीस वर्षे गाजतो आहे, आणि या चाळीस वर्षाच्या आंदोलनाचे एक हिस्सा आहेत माधव भांडारी , त्यांनी पायाला भिंगरी लागल्यागत या विषयावर खेडोपाडी जाऊन प्रत्यक्ष सभा घेतल्या, जनजागृती केली अर्थात असे बहुसंख्य अत्यंत ताकदीचे माधव भांडारी  यांच्यासारखे प्रचंड ताकदीचे जिद्दीचे कार्यकर्ते भाजपा, रा. स्व. संघ किंवा त्यांच्या विश्व हिंदू परिषदेसारख्या परखड हिंदू संघटनांकडे होते म्हणून आज हे कार्य तडीस जात आहे. १९८४ ते आजतागायत सतत माधवराव या रामजन्मभूमी लढ्यात सक्रिय होते सक्रिय आहेत म्हणून त्यांना अयोध्या हा विषय मुखोदगत आहे थोडक्यात भांडारी  हे अयोध्या विषयाचे जीते जागते भांडार आहे, असल्याने त्यांचे अयोध्या हे ग्रंथमय पुस्तक अत्यंत वाचनीय ठरले आहे म्हणजे ज्यांना अयोध्या रामजन्मभूमी राममंदिर विषय नेमके जाणून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी तर हे पुस्तक साक्षात खजिना आहे. असे विषय तर पक्षभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात उपलब्ध करून द्यावेत. प्रत्यक्ष अनुभवातून व आंदोलनातून हा विषय भंडारी यांनी हाताळला असल्याने माणूस अयोध्या वाचतांना भान विसरतो अगदी तहान भूक देखील विसरतो. अयोध्या प्रकरणी बारीक सारीक माहिती आपल्या ओघवत्या शैलीतून माधवरावांनी अत्यंत प्रभावी व व्यापक मांडलेली आहे त्यावर त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी ठरावे. माधव भांडारी  यांच्या अयोध्या या ग्रंथसदृश पुस्तकावर एखादा सिनेमा देखील निघावा... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी